आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Spread the love

भूम : कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन (ता. ११) दत्त मंदिर पेठ येथे समाजातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात समाजहिताच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसेच समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

महिला उद्योजक व व्यवसाय प्रशिक्षण शिबिर भूम येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुलवंत वाणी नारीशक्ती योजना आणि २०२५ हे वर्ष महिलांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा समाधान माळवदे यांनी केले, तर प्रस्तावना सुषमा शाम होळकर यांनी सादर केली.

कार्यक्रमाला समाजातील विविध मान्यवर महिलांची उपस्थिती होती. यामध्ये सीमा माळवदे, शिल्पा होळकर, सुषमा होळकर, सपना वासकर, जयश्री तोडकर, संजीवनी शेटे, ज्योती शेटे, रेखा शेटे, मनीषा वराडे, राजश्री शेटे, सुनिता महाजन, छाया शेटे, ज्योती वराडे, अश्विनी शाहीर, प्रतीक्षा शेटे, विजया औटी, सपना जमकावळे, ऐश्वर्या शेटे, आरती शेटे, पूजा शेटे, सुनिता शेटे, भक्ती शेटे, गौरी शेटे, स्मिता खोले, योगिता शेटे, अरुणा शेटे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचा उद्देश समाजातील महिलांना सक्षम करणे, त्यांना विविध प्रशिक्षणांद्वारे स्वावलंबी बनवणे आणि समाजातील विविध योजनांबद्दल माहिती देणे हा होता.