आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शी उपविभाग संघ उपविजेता, पोलीस अधीक्षक कार्यालयाचा शहीद अशोक कामटे ट्रॉफीवर कब्जा

Spread the love

बार्शी : पवन श्रीश्रीमाळ

एसपी चषक २०२५ अंतर्गत आयोजित शहीद अशोक कामटे ट्रॉफी स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात बार्शी उपविभाग संघाचा पराभव करत विजेतेपद मिळवले, तर बार्शी उपविभाग संघाने उल्लेखनीय खेळ करत उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेत प्रत्येक उपविभागातील एक संघ सहभागी होता. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. शहीद अशोक कामटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेने पोलीस दलातील सहकार्य व खेळभावना वृद्धिंगत करण्याचे कार्य केले.

खेळाडूंची कामगिरी आणि संघाचे कौतुक बार्शी उपविभाग संघाच्या सन्माननीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.विजेत्या व उपविजेत्या संघांना पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

बार्शी उपविभाग संघाचे खेळाडू (उपविजेता संघ)
बार्शी पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल

पोनि कुंदन गावडे
सपोनि दिलीप ढेरे
पोह अमोल भोरे
पोना सागर सुरवसे
पोकॉ इसामियाँ बहिरे
पोकॉ शरद वाघमोडे
पोकॉ रोहित बागल
पोकॉ पांडूरंग जगताप
पोकॉ धनराज फत्तेपुरे
पोकॉ हनवंता खोकले
पोकॉ सागर वाकळे
पोकॉ अनिकेत मोरे
पोकॉ ओमप्रकाश दासरे
पोकॉ शैलेश शिंदे