आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणीला घरी नेऊन केला लैंगिक अत्याचार

Spread the love

पुणे: महाविद्यालयातील एका तरुणीला घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुण क्लासमेटला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने पीडितेचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि दोन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार करत राहिला.

नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच महाविद्यालयात शिकत होते. आरोपीने “माझ्या आईची भेट घालून देतो,” असे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला आणि तिला घरी नेले. घरी कोणी नसताना, त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला आणि नकळत त्या घटनेचा व्हिडिओ तयार केला.

ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार त्यानंतर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी तिला कॉलेजमधून दुचाकीवर लॉजवर नेत असे आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करून पुन्हा कॉलेजमध्ये आणून सोडत असे. धमकीमुळे तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

१२ जानेवारी रोजी कॉलेजमध्ये आरोपीने तरुणीला त्याच्या सांगण्यानुसार न वागल्याने लायब्ररीत तिच्या कानाखाली मारले आणि हातातील बॅग फेकून मारली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळे तरुणीने हा प्रकार घरी सांगितला.

तरुणीच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख करीत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगावी. अशा प्रकारच्या घटनांना तोंड देताना त्वरित विश्वासार्ह व्यक्तीशी संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी.