आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Spread the love

पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढून याबाबत माहिती दिली. या बदल्यांमध्ये वाहतूक, गुन्हे आणि विशेष शाखांमधील निरीक्षकांना पोलीस ठाण्यांमध्ये तर पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांना विविध शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे.

सावळाराम साळगावकर (वाहतूक शाखा) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ

राहुल गौड (खडक) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर

संजय मोगले (नव्याने हजर) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

सुनिल थोपटे (वाहतूक शाखा) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क

दिलीप फुलपगारे (नियंत्रण कक्ष) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी

सीमा ढाकणे (विशेष शाखा) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर

मनिषा पाटील (विशेष शाखा) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड

राजेंद्र पन्हाळे (गुन्हे शाखा, विमानतळ) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर

सत्यजित आदमाने (विशेष शाखा) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी

नरेंद्र मोरे (कोर्ट कंपनी) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक

सुरेश शिंदे (सायबर) → वाहतूक शाखा

रुणाल मुल्ला (कोरेगाव पार्क) → वाहतूक शाखा

संगीता जाधव (गुन्हे शाखा) → वाहतूक शाखा

राजेंद्र करणकोट (लोणी काळभोर) → वाहतूक शाखा

स्वप्नाली शिंदे (सायबर) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर

दशरथ पाटील (भारती विद्यापीठ) → विशेष शाखा

सतीश जगदाळे (खडकी) → विशेष शाखा

गुरदत्त मोरे (वाहतूक शाखा) → विशेष शाखा

माया देवरे (मार्केटयार्ड) → गुन्हे शाखा

संतोष पांढरे (हडपसर) → गुन्हे शाखा

संजय पतंगे (वानवडी) → गुन्हे शाखा

छगन कापसे (सहकारनगर) → गुन्हे शाखा

संतोष पाटील (विशेष शाखा) → मनपा अतिक्रमण विभाग