वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महिलांचा उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे दिनांक १६ जानेवारी २०२५, गुरुवार रोजी संध्याकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचनालयाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महिला वाचक सभासदांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून रेसिपीचे पुस्तक आणि तिळगुळ देण्यात आले. महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची पावले ज्ञानमंदिराकडे वळावीत आणि केवळ “चूल आणि मूल” या संकल्पनेपलीकडे जाऊन विविध विषयांवर वाचन करण्याची प्रेरणा मिळावी, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
वाचनालयात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. वाचनालयाचे पदाधिकारी व संचालक मंडळ यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. या हळदीकुंकू कार्यक्रमात ५० ते ६० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमध्ये शितल भंडारी, स्मिता कांकरिया, राजुल कांकरिया, राणी कांकरिया
हेमा कांकरिया, सपना कुंकूलोळ, सुनीता सुराणा, रक्षा देढिया, सपना गुगळे, प्रियंका श्रीश्रीमाळ, तृप्ती गुगळे, सुनीता रुनवाल, शितल कुंकूलोळ, अर्चना भंडारी, प्रिया गुगळे, मोना सुराणा, अमृता कुंकूलोळ, पुनम कोठारी, निता तातेड, दीपा कांकरिया, भावना कांकरिया, चेतना दुग्गड, गौतमी श्रीश्रीमाळ, कोमल बोथरा, सुजाता मुथ्था यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहायक ग्रंथपाल सौ. पल्लवी तौर, क्लार्क विराज पतंगे, सेविका सौ. रेखा यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले.
