शहर स्वच्छतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून सक्शन टँकर उपलब्ध : नागरिकांसाठी मोठी सुविधा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : भुम शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सक्शन टँकर (मलनिसारण गाडी)चे नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
शहरातील स्वच्छता व मलनिसारण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भुम नगर परिषदेस नवीन सक्शन टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या टँकरचे पूजन भुम शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील काही वर्षांपासून नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे यांनी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे सक्शन टँकरची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने ही गाडी भुम नगर परिषदेस मंजूर होऊन आज प्रत्यक्ष सेवेत दाखल झाली आहे.
या प्रसंगी आर.पी.आय. मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, बाळासाहेब अंधारे, पत्रकार अख्तर जमादार, लहुजी शक्ती सेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख अश्विनी साठे, नगरसेवक अभिजीत शेटे, तौफिक कुरेशी, भाग्यश्री माने, रिमा शिंदे, ऋतुराज शिंदे, मुशीर शेख यांच्यासह नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सक्शन टँकरमुळे शहरातील मलनिसारण व्यवस्था अधिक कार्यक्षम होणार असून नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेस चालना मिळणार आहे. नगर परिषदेच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.















