आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

201 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ओन्ली समाजसेवा संस्थेचे रक्तदान शिबिर

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 15, 2026
Spread the love

बार्शी : छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत श्रीराम निवास, वाणी प्लॉट, बार्शी येथे पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 201 रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, युवा उद्योजक विशाल भैय्या वाणी, युवा उद्योजक अमोल डिसले, जनसेवा युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब गव्हाणे तसेच माजी नगरसेवक बापूसाहेब वाणी उपस्थित होते.

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था गेल्या सहा वर्षांपासून 14 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून, हा उपक्रम सातत्याने यशस्वी ठरत आहे. गेल्या वर्षी 151 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता, तर यंदा हा आकडा 201 वर पोहोचला.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत “रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि महादान आहे,” असे सांगत सर्व नागरिकांनी नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, उपाध्यक्ष संतोष शेळगांवकर, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते तसेच संस्थेचे सर्व सदस्य व महिला सदस्य यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चंद्रकांत उलभगत यांनी केले.