आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस सह आयुक्तपदी संजय दराडे

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 16, 2026
Spread the love

पुणे : गृह विभागाने राज्यातील ९२ अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ चे समादेशक आणि अशोक खरात विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पदावर बढतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची सीआयडीमध्ये पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांचीही मुंबईला बदली करण्यात आली आहे.