आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर प्रशासनात आता ‘IAS – IPS’ दांपत्य

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 16, 2026
Spread the love

सोलापूर : सोलापूर प्रशासनात आता IAS – IPS दांपत्याची चर्चा रंगू लागली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुशल जैन यांच्या पत्नी वृष्टी जैन यांनी नुकताच सोलापूरच्या पोलीस उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन या दोन्ही महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये हे अधिकारी दांपत्य एकाच वेळी कार्यरत राहणार आहे.

वृष्टी जैन या 19 डिसेंबर 2022 रोजी भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकृतपणे रुजू झाल्या. प्रशिक्षणासह त्यांनी आतापर्यंत सुमारे चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला असून, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

यापूर्वी त्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 9 सप्टेंबर 2024 पासून त्यांनी तेथील जबाबदारी सांभाळली.

दरम्यान, कुशल जैन हेही प्रशासकीय कामकाजातील प्रभावी नियोजन आणि विकासाभिमुख निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यामुळे आता सोलापूरमध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमध्ये अधिक समन्वय आणि गतिमान कामकाज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सोलापूरमध्ये एकाच वेळी महत्त्वाच्या पदांवर IAS – IPS दांपत्य कार्यरत असल्याने प्रशासकीय वर्तुळातही या नियुक्तीची विशेष चर्चा सुरू आहे.