आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात ‘विस्तार केंद्र उद्घाटन आणि कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 12, 2026
Spread the love

भूम : येथील विद्या विकास मंडळ, पाथरुड संचलित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरशी संलग्नित शंकरराव पाटील महाविद्यालयात ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभागा’अंतर्गत विस्तार केंद्राचे उद्घाटन तसेच विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाली.