आवृत्ती पुणे

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला रिक्षात विसरलेला लाखांचा ऐवज

डेक्कन पोलिसांची कामगिरी : लग्नातील साड्या आणि तीन लाखांची रोकड परत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षामध्ये विसरलेले कपडे आणि रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज परत मिळाल्यामुळे लग्नघरातील कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्यातील तपासपथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्गे … Read more

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली

पोलीस दलातील वीरमरण आलेल्यांच्या स्मृतीला पोलीस दलाने वाहिली आदरांजली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यासह देशभरामध्ये मागिल वर्षामध्ये पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीला आज (गुरुवार, दि. २१ ऑक्टोबर) पोलीस स्मृतिदिनी पोलीस दलाच्या वतीने पाषाण येथील सीआरपी येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र येथे पोलीस … Read more

उद्योगपतीस 50 लाख रुपयांची खंडणी मागणी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई – बीएमडब्ल्यू कार व मोबाईल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – प्रसिध्द उद्योगपतीस 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखा युनिट-१ने जेरबंद केले. त्याच्याकडून बीएमडब्ल्यू कार आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला.संतोष कपुरचंद राठोड (48 रा-शुक्रवार पेठ, शाहु चौक) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दि. … Read more

दीड वर्षाची चिमुकली पालकांच्या स्वाधीन

ताडीवाला रोड पोलिसांची कामगिरी : पालकांना दक्षतेचे आवाहन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सापडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात ताडीवाला रोड पोलिसांना यश मिळाले असून, पालकांना आपल्या पाल्याकडे निक्षून लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्षामध्ये हरवलेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूप दिले. पालकांनी लहान मुलांकडे लक्ष … Read more

येरवड्यात दुकानदारांना लुटणाऱ्या फरारीच्या मुसक्या आवळल्या

दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-२ची कामगिरी : पुढील कार्यवाहीसाठी येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत दुकानदाराला मारहाण करून लुटणारे टोळीतील फरारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली. निखील संतोष मिसळ (रा. राजगे आळी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

दोघे सराईत वाहनचोर जेरबंद

चंदननगर पोलिसांची कारवाई : चार दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोघा सराईत वाहनचोरांना जेरबंद करण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले असून, चार दुचाकींसह एकूण एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चंदननगर पोलिसांनी चंदननगर भाजीमंडई येथे संशयावरून दोघांना ताब्यात घेतले होते. सनी ऊर्फ विकी विजय अँडी (वय २८, … Read more

पोलिसांचा ‘खबऱ्या’ समजून चाकूने वार करणारा जेरबंद

खडकी पोलिसांची कारवाई : वस्तीमधील लोकांवर चाकू उगारून दहशत पसरविली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांचा खबऱ्या असल्याने समजून तिघांनी एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.कझम ऊर्फ कझमफर हुमायुन इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा … Read more

लिलाव भिशीच्या नावाखाली पती-पत्नीने ६० लाखाला फसविले

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : घोरपडीमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भिशी स्कीम सुरु करुन जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक स्त्रियांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील घोरपडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेची 60 लाखांची फसवणूक केली असून त्यांच्यासह इतर … Read more

दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराची एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबद्धता

फरासखाना पोलीस स्टेशनची कारवाई : मागील पाच वर्षांत सहा गुन्हे दाखल महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. मागील पाच वर्षांत त्याच्यावर गुन्हेगारी कृत्यांचे एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा गुन्हेगार प्रतीक पृथ्वीराज कांबळे ( वय २९, रा. … Read more

मित्राचाच खून करणाऱ्या सराईताला अटक

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : तीन अल्पवयीन साथीदार ताब्यात महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मित्राचाच खून करणाऱ्या सराईताला अटक करण्यात दत्तवाडी पोलिसांना यश मिळाले असून आरोपीच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, मंदार सुनील जोगदंड ( वय २३, रा. आंबिलओढा पुणे) याचा दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सई … Read more