आवृत्ती पुणे

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : टोळक्यातील सातपैकी तिघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : किरकोळ कारणावरून सात जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी अप्पर भागात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या अप्पर भागात छोट्या छोट्या कारणासाठीदेखील मारामारीच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार बुधवारी रात्री दहाच्या … Read more

मानलेल्या दाजीनेच केली घरफोडी !

वारजे पोलीस स्टेशन : समर्थ रेसीडन्सी शिवणे येथील घटना पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मानलेल्या बहिणीकडे घराची चावी ठेऊन जाणार्‍या भावाच्या घरात दाजीनेच घरफोडी केल्याचा प्रकार वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की,तुषार बनकर (रा. समर्थ रेसिडन्सी, शिवणे) हे गावाला जाताना आपल्या घराची चावी … Read more

भुसार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची बिनविरोध निवड

बार्शी : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : बार्शी किराणा व भुसार व्यापारी संघ बार्शी या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश बाफणा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक यश लॉन्स येथे पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश शेलार, सचिव … Read more

शिवशाही बसने जेष्ठ महीलेला उडवले!

बंडगार्डन पोलीस स्टेशन : पुणे स्टेशन येथील घटना महाराष्ट्र ३६०न्यूज पुणे : पुणे स्टेशन येथे प्रवासासाठी आलेल्या एका जेष्ठ महिलेला शिवशाही चालकाने उडवल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे स्टेशन येथे घडली आहे. सोलापूर जिह्यातील केगाव येथील महिला ग्यानदा ज्ञानोबा चौगुले वय ६० वर्ष या … Read more

सॅनिटरी नॅपकिन, व्हेंडिंग मशिन, इन्सिनरेटर मशीनचे वाटप

लिओ क्लब ऑफ बार्शीचा उपक्रम : रक्षाबंधन निमित्त महिलांमध्ये जागृती महाराष्ट्र ३६० न्यूज बार्शी : रक्षा बंधनच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब बार्शी टाऊनच्या वतीने महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन, व्हेडींग मशिन व इन्सिनरेटर (डिस्पोझल) मशिन वाटप करण्यात आले. तरूणींमध्ये सॅनिटरी पॅड वापर व डिस्पोझल बद्दल जनजागृती होण्यासाठी बार्शीच्या लिओ क्लबने हा सामाजिक उपक्रम राबवला. यावेळी नर्सिंगचे … Read more

कोयता बाळगणाऱ्या आरोपीसह गंभीर गुन्ह्यातील दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : मोस्ट वाँटेड आरोपींना शिताफीने पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : बेकायदा लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीसह गंभीर गुन्ह्यातील दोन मोस्ट वाँटेड आरोपींना अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. खंडणीविरोधी पथक एकचे सहायक पोलिस निरिक्षक बुवा, सहायक पोलिस फौजदार वांजळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव व … Read more

सुखसागरनगर येथे ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून एकाचा मृत्यू

सुरक्षा उपाययोजनेच्या अभावाने दुर्घटना : ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुखसागरनगरमध्ये ओढामार्गाच्या कामाठिकाणी दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा उपाययोजनेचा अभावाने ही दुर्घटना घडली असून, ठेकेदार कंपनीसह तीन अभियंत्यांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरात … Read more

बोलेरो पिकअपचा पाठलाग करून तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त

विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौघांपैकी दोन जण अटकेत महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : नगररोड परिसरात बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपचा पाठलाग करून विमानतळ पोलिसांनी तब्बल वीस लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी चौघांपैकी दोघांना अटक केली असून,आणखी दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी (16 ऑगस्ट) रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ पोलिसांच्या तपासपथकातील पोलिस नाईक सुशील … Read more

पेट्रोलपंपावर लुटणारे दोघे सराईत जेरबंद

विमानतळ पोलिसांची कामगिरी : साठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावर आठवड्यापूर्वी मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील १६,००० रुपये चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.. लोहगाव येथील धानोरी रोड परिसरातील … Read more

गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीस अटक

गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई : वाहनचोरी, दरोडे, गोळीबार करणारा जेरबंद   महाराष्ट्र ३६० न्यूज : पुणे : शिवणे गावात गोळीबार करून फरारी झालेल्या सराईत गुन्हेगार  कार्तिक इंगवलेला अटक युनिट ६ चे पोलीस पथक गस्तीवर असताना ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना त्यांच्या बातमीदाराने कार्तीक इंगवले हा नाशिक फाटा येथे येणार असल्याची माहिती दिली होती. … Read more