आवृत्ती पुणे

धक्का का मारला म्हणून विचारले असता लोखंडी चेनने केली मारहाण

विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक रस्त्याने जात असताना धक्का का मारला विचारले म्हणून तिघांनी लोखंडीचेन व हाताने मारहाण केली. ही घटना विमाननगरमधील बजाज फिर्न्झरसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ६ सप्टेंबर २०२१ रोजी घडली. निल जैन (वय २४, रा. कोनार्क ए-प्लस, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओळखीच्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : धानोरी परिसरातील सोसायटीमध्ये घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० … Read more

वानवडीमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल

वाहतूकचे पोलीस उपायुक्त श्रीरामे : पर्यायी रस्त्यांचा वाहनचालकांनी अवलंब करावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वानवडी भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान वाहतुकीत बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. १) … Read more

अक्कलकोटे परिवाराच्या वतीने कार्डियाक ॲम्बुलन्स लोकार्पण

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बार्शी ट्रस्टला २१ सप्टेंबर रोजी देणार भेट पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २१ सप्टेंबर रोजी अक्कलकोटे परिवाराच्या वतीने १७वा पुट्ठा रोडगा रस्ता, बार्शी ट्रस्टला कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले. कै. हरिभाऊ अक्कलकोटे … Read more

तडीपार गुन्हेगार विनायक कराळे जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई : एक रॅम्पो चाकू जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-१ कासेवाडी (सोनवणे हॉस्पिटल) येथे सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून एक रॅम्पो चाकू जप्त केला. त्याच्यावर आतापर्यंत १८ गुन्हे दाखल आहेत. विनायक बंडू कराळे (वय 22, रा. कासेवाडीस पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

तुझा गेमच करतो म्हणत पालघनने केला वार

येरवड्यातील कंजारभाटवस्तीमधील प्रकार : येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मी तुला खल्लास करतो… तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली… आज तुझा गेमच करतो.. असे म्हणून हातातील पालघन फिर्यादीस मारली. मात्र, ती त्याने चपळाईने हुकवून घरामध्ये पळून गेला आणि दरवाजा बंद केला. त्यामुळे आरोपीने रागाने घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकीवर पेट्रोल … Read more

भाजप नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस; पुणे शहरात खळबळ

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शेफ्रॉन हॉटेल नवी पेठ शास्त्री रोड परिसरात घडली आहे. विकी उर्फ वितुल क्षिरसागर, मनोज पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी), महेश आगलावे (रा. लोहीयानगर) या … Read more

खडकी रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टीमध्ये किरकोळ कारणावरून मारामारीत एकाचा खून

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खडकी रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टीमध्ये किरकोळ कारणावरून मारामारी झाली. घातक शस्त्राने वार केल्याने एकाचा मृ्त्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अनिल शेलार यांनी फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. रमजान सैय्यद (वय अंदाजे ३५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, खडकी रेल्वे स्टेशनसमोरील झोपडपट्टी … Read more

बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

वडगाव-मावळ येथील घटना : एक अटकेत, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बनावट गुटखा तयार करणाऱ्या वडगाव-मावळ (जि. पुणे) येथील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी कच्चा माल, यंत्रसामग्री, कार असा एकूण 11 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीकांत बाळू चांदेकर (वय-32 रा. ढोरे … Read more

जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न

दोघे जेरबंद : भंगार विक्रेत्यांमध्ये राडा, दोन्ही भंगार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आपल्याकडे काही वर्ष काम करीत असलेल्याने स्वत: नवीन दुकान टाकल्यानंतर भावाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन कामगारांना जेवायला बोलावले. त्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसर्‍या भंगार विक्रेत्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा … Read more