उस्मानाबाद

येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा रिपाई ची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा – भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे.

येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा रिपाई ची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा – भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे.

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: आगामी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात आज कळंब येथे भारतीय जनता पार्टी (भाजपा) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संयुक्त बैठक भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय कळंब येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत होऊ घातलेल्या न. प. निवडणुकीत संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

ही बैठक माजी नगराध्यक्ष यशवंत दादा दशरथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपाई ची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागावे असे आवाहन यावेळी केले.

आरपीआय प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसाट, शहर महिला आघाडी अध्यक्ष संगीता कोकीळ, नागजी घुले, शंकर वाघमारे, भारत करंजकर, सुदर्शन कोळपे, अमर चाऊस, अजय सरवदे, बजरंग शिंदे, शितल चोंदे, प्रशांत लोमटे, मकरंद पाटील, संजय जाधवर, शिवाजी गिड्डे, शेख मिनाज, दत्तात्रय जंत्रे, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे, नितीन हरकर, बाबुराव शेंडगे, विशाल ठोंबरे, परशुराम देशमाने, बापू माने, शिवाजी शेंडगे, बलभीम पवार, शेख सलीम, कुंदन गायकवाड, बळी चव्हाण, इम्रान मुल्ला, गोपाल चोंदे, अरविंद कदम, जिव्हेश्वर कुचेकर, अब्दुल मुलानी, गोविंद गायकवाड आदी भारतीय जनता पार्टी व रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा
येत्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा रिपाई ची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा – भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button