निरोगी जीवनशैली व हरित संदेशाचा सामाजिक संगम
महाराष्ट्र जैन वार्ता
जैन सोशल ग्रुप पुणे परिवाराच्या वतीने योग व पर्यावरण महिना लक्षात घेऊन यश लॉन्स, मार्केट यार्ड येथे एक विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचा प्रसार करणे आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती घडविणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध योगगुरू राखी गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग परिचय व सत्राने झाली. त्यांनी विविध योगासने, श्वसन तंत्र आणि ध्यानधारणा यांचे मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व जेएसजी सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आरोग्याकडे एक प्रेरणादायी पाऊल टाकले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक सदस्यास “धरतीमाता” यांच्या नावाने एक वृक्ष भेट देण्यात आला, जो जीवन, हरितता आणि शाश्वततेचे प्रतीक ठरला. या उपक्रमामुळे सामाजिक स्तरावर पर्यावरण जागृतीची ठोस पावले उचलली गेली.
योग समिती समन्वयक म्हणून जेएसजीयन ऋषिकेश शाह यांनी योग उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. तर सोशल व पर्यावरण समिती समन्वयक जेएसजीयन रुपल भावेश शाह यांनी वृक्षारोपण व पर्यावरण विषयक उपक्रमांचे सुयोग्य नियोजन केले.
या कार्यक्रमास २०० पेक्षा अधिक सदस्यांनी उपस्थित राहून उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जेएसजी मार्केट यार्ड ग्रुपचा विशेष सहभाग आणि कौतुकास्पद योगदान लाभले.
यावेळी पोपटलाल ओस्तवाल, बिरेन शहा, राजेंद्र धोका, दिलीप मेहता, दिलीप चोरबेले, सुजस शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात JSG पुणे टीमचे तसेच MaRC टीमचे सर्व सदस्य सक्रीय सहभागी होते. त्यांनी नियोजन, अंमलबजावणी आणि सहभागामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
हा उपक्रम केवळ आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीपर नव्हता, तर सामाजिक एकजूट, सहभाग, ऐक्य आणि जबाबदारीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. जैन सोशल ग्रुप पुणे परिवाराने आरोग्यदायी आणि हरित भविष्यासाठी ठोस पाऊल उचलले.
