विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगाव विमानतळावर गो फस्ट एरो ब्रिज सेकंडरी चेक पॉईंटवर घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना एका मुळच्या काश्मीरच्या तरुणाने माझी बॅग वारंवार का चेक करीत आहेत, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का, असे म्हटल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. लोहगाव विमानतळावरील गो फस्ट एरोचे ब्रिज सेकंडरी लायडर पॉईट चेक येथे १३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी समिरन विजय अंबुले (वय २०, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका २१ वर्षाच्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हा तरुण मुळचा काश्मीरचा राहणारा आहे. सध्या तो भुगाव येथे राहतो. तो गो एअरने जाणार होता.
त्यासाठी तो विमानतळावर आला होता. यावेळी त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा गो फस्ट एरो चे ब्रिज सेकंडरी लायडर पॉईटवर बॅगेची तपासणी करण्यात येऊ लागली.
आपलीच बॅग पुन्हा चेक केली जात असल्याने त्याने तेथील कर्मचार्यांना माझी बॅग वारंवार का चेक करीत आहेत, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? असे प्रश्नात्मक विचारले असता, बॉम्ब हा शब्द ऐकल्यावर तेथील कर्मचार्यांनी सर्वांना अलर्ट केले. या तरुणाकडे पुन्हा तपासणी करून, असे बोलून गोंधळ करुन विनाकारण अफवा पसरवली, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

















