महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येथील समर्थ पोलिस स्टेशन परिसरात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुजाहिद शेख, वय 25, रा. भवानी पेठ याला 10 लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पोलिस नाईक साहिल शेख व पोलिस कॉन्स्टेबल अझीम शेख यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार छापा मारून शेखला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सुमारे 10 लाख 40 हजार रूपये किंमतीचा 52 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, पो उप निरीक्षक डी. एल. चव्हाण, पोलिस सहायक पोलिस निरीक्षक घुले, पोलिस हवालदार संतोष देशपांडे , पोलिस हवालदार संदीप जाधव, पोलिस नाईक साहिल शेख, पोलिस अमलदार अझीम शेख, मयूर सूर्यवंशी,योगेश माढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड़ यांच्या पथकाने केली आहे.
















