महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे: कात्रज येथील आनंद दरबार मध्ये अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लकी ड्रॉ द्वारे नाव काढून सामन्याना या आरती चा मान मिळाला. आरती दरम्यान प.पु. आभाश्रीजी म.सा. आदी ठाणा यांनी प्रभू रामचंद्र विषयी व्याख्यान दिले. या आरतीसाठी सिनियर पी. आय दशरथ पाटील, संदीप बेलदरे यांच्या सह आनंद दरबार परिसरातील 300 हुन अधिक भाविक उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या आरतीसाठी संतोष दुगड, मनोज सुराणा, आनंद कूवाड, डॉ. अर्चना गादिया, डॉ. अंकिता धोका यांनी परिश्रम घेतले.
