महाराष्ट्र जैन वार्ता : अनिल डुंगरवाल
पारगाव : कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी मा. सा. यांच्या सुशिष्या प.पू. नमिताजी मा.सा., प.पू. सजगश्रीजी म. सा. आदी ठाणा दोन यांच्या सानिध्यात पारगाव येथील जैन स्थानक येथे रविवार दि. १८ रोजी गुरु गणेश चालीसा पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पारगाव येथील सर्व जैन बांधव उपस्थित होते.
