दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता. : अभिजित डुंगरवाल
पुणे : दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुपच्या वतीने आयोजित भव्य रक्तदार शिबिरात सुमारे ७५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्व. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ’ महा रक्तदान शिबीराचे आयोजन पुष्पमंगल, बिबवेवाडी पुणे येथे करण्यात आले होते. महारक्तदान शिबीराचे उद्घाटन सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबीरास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
यामध्ये आमदार रविंद्र धंगेकर, अभय छाजेड, माजी नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, प्रविण चोरबेले, मनोज देशपांडे, आप्पा रेणूसे तसेच जितो अॅपक्सचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, जितो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, देवीचंद जैन, इंदर जैन, रविंद्र सांकला, नरेंद्र बलदोटा, ललित जैन, सुनील देसरडा व इतर अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते.
गेल्या ५ वर्षापासून दुगड ग्रुप व निर्जरा ग्रुप ‘‘स्व. हिरालालजी दुगड यांचे स्मरणार्थ” रक्तदान शिबीराचे आयोजन करीत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळतो.
या रक्तदान शिबीरासाठी दुगड ग्रुप तर्फे अॅड. रविंद्र दुगड व ऋषभ दुगड व निर्जरा ग्रप तर्फे गिता बोथरा, कविता पटवा, शोभा दुगड, मीना सेठिया, निता मेहता, सरिता बलदोटा, सिध्दार्थ हॉस्पीटलचे डॉ. विजय सेठिया, गौतमलब्धीचे हेमंत रायसोनी, परेश बोरा, दिलीप कटारिया, गौतम नाबरिया, संग्राम होनराव, श्वेता होनराव, हर्षल शिंगवी व जिनसा रायसोनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
महारक्तदान शिबीरासाठी प्रमोद दुगड, सुनिल दुगड, मनोज दुगड, प्रकाश दुगड, प्रविण दुगड, संदीप दुगड, किर्तीराज दुगड, महेंद्र सुंदेचा, मनोज छाजेड यांच्या सह निर्जरा ग्रुपच्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.
महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी या शिबीरात सहायोगी म्हणून गौतम निधी, डिवाईन जैन ग्रुप, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, आनंद दर्शन युवा मंच, आनंद दरबार फर्स्ट, विजन प्री स्कुल, आरंभ यात्रा संघ, राजश्री शाहू बैंक, श्री सहयाद्री पतसंस्था फ्रेंड्स क्लब फॉर एव्हरसहाय्यता ग्रुप, गुड टाईम ग्रुप, आयएसओ सील क्लब, दी सोशल युथ क्लब, एफटीएन फौंडेशन आणि आर.जे. हेल्पिंग हँड्स या संस्थांनी विशेष सहकार्य केले. तसेच या रक्तदान शिबीरामध्ये आयएसआय, आधार, भारती हॉस्पीटल, आनंदऋषिजी, पुना हॉस्पीटल, बिडकर पीएसआय या सात ब्लॅड बँका सहभागी झालेल्या होत्या.
तरुणांच्या सहभागाने रक्तदान शिबीर यशस्वी – सर्वांच्या सहकार्यामुळे व सर्व संस्थांच्या तरूण कार्यकत्यामुळे महारक्तदान शिबीरास मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केले. अशाप्रकारे दुगड ग्रुप तर्फे “स्व. हिरालालजी दुगड यांचे स्मरणार्थ” महारक्तदान शिबीराचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येणार असल्याचे अॅड. रविंद्र दुगड यांनी सांगितले व सर्व आलेल्या रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानले.
