महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल
पारगाव : परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांच्या 32 व्या पुण्यस्मृती दीनानिमित्त व प. पू. आशिषमुनिजी म.सा यांच्या 72 व्या जन्मदिवसानिमित्त प.पू. समकीतमुनिजी म.सा., प.पु. भवांतमुनीजी म.सा., प.पू. जयवंतमुनिजी म.सा. यांच्या सानिध्यात नेकनूर जि. बीड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लातूर, बीड, आंबेजोगाई, कळंब, पारगाव, नांदूर, चौसाळा यांच्यासह विविध संघांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन नेकनूर संघाचे अध्यक्ष पोपटलाल लूनावत, प्रदीप श्रीश्रीमाळ, विलास कोठारी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल कोटेचा तर आभार डॉ. प्रशांत लूनावत यांनी मानले.
