आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन संघटनांच्या एकजुटीसाठी पुणे जिल्हा कार्यकारिणीचा विशेष दौरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 23, 2026
Spread the love

पुणे : जिल्ह्यातील विविध जैन संघटनांमध्ये समन्वय वाढविणे, संघटनात्मक कार्याला गती देणे आणि समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाच्या वतीने वडगाव मावळ, कामशेत व लोणावळा परिसरात आयोजित करण्यात आलेला कार्यकारिणीचा विशेष दौरा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या दौऱ्याच्या माध्यमातून विविध जैन संघांशी संवाद साधत समाजातील एकजूट आणि परस्पर समन्वय वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यादरम्यान नितीन बेदमुथा यांच्या वतीने भक्ती शक्ती येथे कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी वडगाव मावळ, कामशेत आणि लोणावळा येथील जैन संघांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या दौऱ्यादरम्यान समाजाच्या विविध समस्या, धार्मिक उपक्रम, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक बळकटीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व स्थानकवासी जैन संघटनांना एका विचाराने जोडणे, आपापसांतील संवाद वाढविणे आणि धार्मिक व सामाजिक कार्यात सर्वांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे अध्यक्ष विलास राठोड यांनी सांगितले.

या दौऱ्यामध्ये अनिल नहार, सागर सांखला, सतीश सुराणा, सुभाष ललवाणी, नितीन बेदमुथा, अशोक पगारिया, चंद्रकांत लोढा, प्रमोद लुंकड, राजेंद्र मुनोत, रामलाल शिंगवी, नितीन बाठिया आणि प्रितेश कर्नावट यांच्यासह पुणे जिल्हा स्थानकवासी जैन संघाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या विशेष दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध जैन संघटनांमधील परस्पर संवाद आणि समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात धार्मिक, सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच सकल जैन समाजाला एकत्र आणण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.