महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
नासिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल यांनी c s r फंडातून दिलेल्या देणगीतून भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मातोश्री सौ. कमलाबाई रसिकराल धारिवाल यांच्या स्मरणार्थ सुमारे 45 लाख रुपये खर्चून पाण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
सीएसआर फंडातून उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल निधी उपलब्ध करून दिला आहे. रोप वे, पहिली पायरी प्रवेशद्वार ते मंदिर परिसरात 13 ठिकाणी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना विश्रांतीसाठी कमलछत्रही उभारले आहे. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर प्युरिफिकेशन आणि फिल्ट्रेशन प्लांट ची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणी सुविधेचे लोकार्पण गुढी पाडव्याच्या दिवशी मंडळाचे अध्यक्ष नाशिक चे जिल्हा न्यायाधीश श्री बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते झाले. सौ. दिना प्रकाश धारिवाल, साक्षी धारिवाल आणि आदित्य धारिवाल यांनी माणिकचंद ग्रुपच्या वतीने योजना संस्थानकडे सुपुर्द केली.
प्रकाश धारिवाल श्री क्षेत्र देहू येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रकाशशेठ धारिवाल यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर या सोहळ्याला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त तथा तहसीलदार, कळवण रोहिदास वारुळे, ॲड. ललित रवींद्र निकम, ॲड. दीपक पाटोदकर, डॉ. प्रशांत देवरे, मनज्योत पाटील, भूषणराज तळेकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपसमिती सदस्य तुषार बर्डे, गिरीधर गवळी, सरपंच रमेश पवार, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, अधीक्षक प्रकाश जोशी, नरेंद्र सूर्यवंशी, सागर निचित, गोविंद निकम, रोप-वे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, पुरोहित संघाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित, अजय दुबे, संदीप बेनके, निलेश कदम, शांताराम गवळी, मधुकर गवळी, प्रशांत निकम, धनाजी बर्डे, अशोक जगताप आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर लाखो भाविक येत असतात. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. – प्रकाशशेठ धारिवाल – प्रसिद्ध उद्योगपती, पुणे
श्री क्षेत्र देहू येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रकाशशेठ धारिवाल यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. – लक्ष्मीकांत खाबिया – शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष
