महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानक येथे डिवाइन जैन ग्रुप आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने चार व्हीलचेयर्सचे वाटप करण्यात आले.
रेल्वे स्थानकात येणाऱ्या विकलांग, अपंग प्रवाशांना काम करणाऱ्या ज्येष्ठ, कुली आणि ज्यांना आवश्यक आहे. त्या प्रत्येक प्रवासी यांना या व्हीलचेयर्स उपयोगी येतील असे डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले.
तसेच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यावेळी २५ झाडे पुणे रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन रेल्वे स्टेशनदय्रेक्तोर प्रमुख मदनलाल मीना (Station Director Pune, Indian Railway) यांच्या हस्ते झाले.
या वेळेस रामपाल बड़पग्गा (जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे) व सर्व रेल्वे अधिकारी, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संकेत शहा, प्रियांका शहा, राजेश ओसवाल, मेहुल शहा, हार्दिक शहा, तिमिर संघवी, चेतन जैन, पंकज साखरिया, हर्षल नवलखा, भूषण कर्णावट, तनिष जैन, रोहन शर्मा, खुशबू शहा उपस्थित होते.















