महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील दर्शन प्रकाश दुगड या 25 वर्षीय तरुणाने देशातील सर्वात महत्त्वाच्या २०२० साली झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले होते. दर्शन दुगड यांनी वयाच्या 25 व्या वर्षी यूपीएससीतून दुसऱ्या प्रयत्नामध्ये हे यश मिळवत त्यांनी देशात 138 वा क्रमांक पटकावला होता.त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाला आहे.
आर्णि गावच्या दर्शन दुगड यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर त्याने इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर दर्शनने दोन वर्षे एका खासगी कंपनीत काम केले. गेल्या तीन वर्षांपासून त्याने यूपीएससीची तयारी केली असून दुसऱ्या प्रयत्नामध्ये, वयाच्या 25 व्या वर्षी उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली.
दर्शनला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय ते त्यांच्या आई वडिलांचे असल्याचे सांगतात. दर्शन यांनी दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यश खेचून आणले. दर्शनचे शिक्षण बीटेक सिव्हिल असे असून शिक्षणानंतर त्यांनी दोन वर्ष एका कंट्रक्शन कंपनी मध्ये जॉब केला.
जॉब सोडून त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली गाठली. त्यांना दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळाले आहे. दर्शन दुगड यांनी ट्रेनी म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चा 3 महिने चार्ज सांभाळला आहे. सध्या त्यांची हैद्राबाद येथे पुढील ट्रेनिंग चालू असून लवकरच ते देश सेवेसाठी रुजू होतील.त्यांच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कडून शुभेच्छा.
