महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती २५ जून रोजी मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची तात्पुरती यादी पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे या कार्यालयाच्या sp.railways.pune@mahapolicegov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
२०२२-२३ करीता सन २०२२-२३ ची रिक्त असलेली ५० पोलीस शिपाई पदांची व चालक पोलीस शिपाई १८ पदे अशी एकूण ६८ पदांची पोलीस भरती शारीरिक चाचणी दि. १९. ते २३ जुनपर्यंत आयोजित करण्यात आली होती. मात्र पावसामुळे तसेच सदर शरिरीक चाचणीस उमेदवारांना दि. २५ जुन शारीरिक चाचणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
या मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवाराच्या गुणांची तात्पुरती यादी पोलीस अधीक्षक कार्यालय, लोहमार्ग, पुणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मैदानी चाचणीस ३०५९ उमेदवारांना बोलविण्यात आलेले होते त्यापैकी २०१३ उमेदवार उपस्थित राहीले.
त्यातील १८३८ उमेदवार पात्र झालेले असुन त्यांनी यशस्वीरीत्या मैदानी चाचणी परीक्षा दिली व १७५ उमेदवार अपात्र ठरले. सदर मैदानी चाचणीत दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणांची तात्पुरती यादी पोलीस अधीक्षक लोहमार्ग, पुणे या कार्यालयाच्या sp.railways.pune@mahapolicegov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
उमेदवारांना मैदानी चाचणीतील मिळालेल्या गुणाबद्दल तक्रारीसंबंधाने काही आक्षेप/तक्रार असल्यास उमेदवारांनी दि.२७ जुन पर्यंत आपला आक्षेप तक्रार वरील नमुद संकेत स्थळावर/समक्ष या कार्यालयास सादर करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे यांनी केले आहे.
