जगत हिताचे विचार ऐकण्याची पुणेकरांना संधी
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजीत डुंगरवाल
पुणे : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी, साध्वी श्री शीलापीजी, साध्वी श्री विभाजी व साध्वी श्री मनस्वीजी यांचा भव्य चातुर्मास मंगल प्रवेश शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सकाळी 8:30 वा. वर्धमान प्रतिष्ठान सेनापती बापट रोड येथे होणार आहे.
आचार्य श्री चंदनाजी यांनी आपल्या विचाराने आणि कृतीने आपल्या देशामध्ये अनेक मोठे सामाजिक बदल घडवले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केले आहे.
जेथे मंदिर तेथे शाळा, जेल विरहित जग असे अनेक जगत कल्याण विचार घेत आचार्य श्री चंदनाजी आपल्या वाणीतून पुणेकरांना मार्गदर्शन करणार आहेत. दररोज सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत त्यांचे प्रवचन होणार आहे तसेच दर शनिवारी व रविवारी वर्धमान प्रतिष्ठान येथे त्यांचे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती इच्छाबाई बोरा, अतुल बोरा, जयंत शहा, मोहन भंडारी एवं कुमार बोरा यांनी केले आहे. अशी माहिती वर्धमान प्रतिष्ठान, शिवाजीनगर चे अध्यक्ष विलास राठोड आणि सेक्रेटरी जितू तातेड यांनी दिली.
