आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्रमण संघाच्या स्थापनेत प.पू. श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांचे योगदान महत्वाचे

Spread the love

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील श्री आदिनाथ स्थानक भवन मध्ये चातुमर्मासा निमित्त आलेले श्रमण संघीय प्रवर्तक प.पु श्री प्रकाशमुनीजी म.सा. आदि ठाणा 3 आणि मधुर व्याख्याता प.पू श्री चंदनबालाजी म.सा आदि ठाणा २ यांचा चतुर्विध संघाचा चतुर्मास संपन्न होत आहे.

श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन टस्टतर्फे मालव केसरी, शांतीदुत, प्रसिद्ध वक्ता, श्री पुज्य गुरुदेव श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांची ४० वी पुण्यतिथी साजरी केली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रमणसंघीय प्रवर्तक श्री प्रकाशमुनीजी बोलत होते, ते म्हणाले,”श्रमण संघाच्या स्थापनेत मालव केसरी प.पु. श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांनी महत्वाचे योगदान दिले आहे.

प्रथम आचार्य प.पु. श्री आत्मारामजी म.सा यांची शिफारस प.पू. श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांनी केली व त्यावेळी प्रधानमंत्री प.पु. श्री आनंदऋषिजी म.सा. तर युवाचार्य प.पू. श्री देवेद्रमुनीजी म.सा. यांची निवड त्यावेळी करण्यात आली.

या सर्वाच्या निवडीमध्ये प.पु.सौभाग्यमुनीजी म.सा. यांची महत्वाची भुमिका होती.”मालवकेसरी प.पु. श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांची पुण्यातिथी गेले आकरा दिवस जप, तप, साधनेने साजरी होत आहे. त्यामध्ये गुरु मंत्र जप गेली ११ दिवस दुपारी होत आहे.

त्याचे समापन २९ जुलै रोजी होणार आहे. दि. २७ ते २९ जुलै पर्यंत तेला तप असुन अनेक भाविकांनी तेला तप चे व्रत घेतले आहे. यावेळी पुणे सकल संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, बाळासाहेब धोका, पन्नालाल लुणावत आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष डॉ. धनराज सुराणा, कार्याध्यक्ष अनिल नहार, संजय सांकला, भरत चंगेडे, सुभाष मुथा, मदनलाल बलदोटा, पोपटलाल खाबिया, विजय नवलाखा, सचिन टाटीया, दिलीप बोरा, रमेश नवलाखा, शैलेश नवलाखा, निलेश सुंदेचा मुथ्या, प्रफुल्ल सोळंकी, सचिन रायसोनी, राजेश ललवाणी, गौतम नाबरीया आदिंनी प्रयत्न केले.