महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या निमित्ताने बिबवेवाडी येथील ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीच्या स्टारकिडस् व न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश स्कूलतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच प्रि-प्रायमरी विभागातर्फे फॅन्सीड्रेस स्पर्धेमध्ये राधा-कृष्णांच्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून मुला-मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका उमादेवी उत्तुरे यांनी केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
