आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडी जैन स्थानकात पर्युषण पर्वानिमित्त नवकार महामंत्राचा जाप

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 2, 2024
Spread the love

पुणे : तपस्वीरत्न प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा., अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शानाजी म. सा., प. पू. श्री नियमदर्शनाजी म. सा., प. पू. श्री प्रियालश्रीजी म. सा., प. पू. श्री अंशुश्रिजी म. सा. यांचा २०२४ चा मंगलकारी चातुर्मास बिबवेवाडी जैन स्थानकात मोठ्या उत्साहात सुरू आहे. पर्युषण पर्वाच्या प्रथम दिवसाची सुरुवात महामंगलकारी श्री भक्तामर स्तोत्राच्या अनुष्ठानाने झाली. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त ८ दिवसीय नवकार महामंत्राच्या जपाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी प. पू. श्री सुप्रियदर्शानाजी म. सा. यांनी उपस्थित हजारो भाविकांना उद्बोधन करताना सांगितले की, “पर्युषण पर्व स्वतःला स्वतःशी जोडण्यासाठी आले आहे. गरज आहे ती फक्त आपल्या अंतरंगात डोकावण्याची.

बाहेर खूप दोस्ती केली, इतरांचा आवाज खूप ऐकला, आता स्वतःशी दोस्ती करा आणि स्वतःचा आवाज ऐका. या आपल्या घराकडे परत या.” पर्युषण पर्वाचा प्रथम दिवस भाविकांनी जप, तप यांच्या माध्यमातून साजरा केला.

यात एक उपवास, बेला, तेला, ६ उपवास, आयांबिल, एकासन, सिद्धितप केले गेले. तपस्वींची सर्व व्यवस्था बिबवेवाडी श्री संघाच्या वतीने करण्यात आली होती. बिबवेवाडी श्री संघातर्फे पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, पन्नालाल पितळिया, गणेश ओसवाल, लालचंद कर्नावट, सुनील बलाई, अविनाश कोठारी, चंद्रकांत लुंकड, कीर्तिराज दुगड, संपत भटेवरा, चंपालाल नहार, अशोक नहार, बाळासाहेब कोयाळीकर, रविंद्र दुगड, चंद्रकांत सुराणा, रामलाल संचेती उपस्थित होते.