आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र जैन वार्ता चा महावीर प्रतिष्ठान येथे सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 4, 2024
Spread the love

पुणे : पुण्यामध्ये मागील 9 वर्षापासून जैन समाजातील सर्व बातम्या, समस्या, साधू संताचे विचार प्रखरपणे मांडल्यामुळे महावीर प्रतिष्ठान येथे प.पू. गौतममुनीजी म. सा. यांच्या सानिध्यात सकल जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्र जैन वार्ता चे संपादक अभिजीत डुंगरवाल, संकेत डुंगरवाल यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र जैन वर्ताच्या संवत्सरी विशेष अंकाचे विमोचन पोलीस उपायुक्त आर. राजा, विजयकांत कोठारी, दीपचंद पारख, राजश्री पारख, पन्नालाल लुणावत, वालचंद संचेती, विजय भंडारी, अरुण शिंगवी, अविनाश चोरडिया, अशोक लोढा, अनिल भन्साळी, पृथ्वीराज धोका, आदेश खिवंसरा, पंकज कर्नावट, नितीन ओस्तवाल, प्रविण राका, सुजित लोढा, विजय धोका, अनिल गेलडा, विशाल सोनिग्रा, राजकुमार गांधी, राजेंद्र ललवाणी, जयेश कर्नावट, निलेश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले.