लोढा फाउंडेशनच्या वतीने फूड पॅकेटचे वितरण
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्व. सुभाष गणेशमलजी लोढा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवामध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या सुमारे सात हजारहून अधिक पोलीस बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षद लोढा यांनी केले होते.
