आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भुमच्या आयटीआयचे आचार्य विद्यासागरजी आयटीआय नामकरण

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 24, 2024
Spread the love

भुम : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महायुती सरकारने “आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम” हे नाव दिल्यामुळे जैन संघटनेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले.

भुम तालुक्यातील कुंथलगिरी हे जैन समाजाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. येथे महाराष्ट्र व देशभरातून हजारो जैन बांधव दर्शनासाठी येतात. त्यामुळे भुम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून “आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम” असे नामकरण करण्यात आल्याने जैन बांधवांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

महायुती सरकारच्या या निर्णयाचे भुम तालुका जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शीतल भाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, एखंडे बाहुबली, डॉ. शांतीनाथ अंबुरे, प्रदीप आहेरकर आदींनी स्वागत केले आहे.