आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

माधुरी मिसाळ, संदीप भंडारी यांचा जैन समाजातर्फे सन्मान

Spread the love

पुणे : जैन समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या प्रयत्नांबद्दल महावीर प्रतिष्ठान येथे जैन समाजाच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ आणि संदीप भंडारी यांचा सन्मान करण्यात आला. सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, उद्योगपती अनिल भन्साळी, आदेश खिंवसरा, अनिल गेलडा, नितीन चोपडा, श्रिमल बेदमुथा, महेंद्र मुथा, गिरीश सोळंकी, मयूर कोठारी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.