आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पावापुरी जलमंदिर कात्रज येथे दीपावली दीपोत्सवाचे भव्य आयोजन

Spread the love

पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री महावीर स्वामीजींच्या २५५०व्या निर्वाणकल्याणक आणि श्री गौतम स्वामीजींच्या केवलज्ञान कल्याणकाच्या पावन दिवसाचे औचित्य साधून कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्टतर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिरातील श्री पावापुरी जल मंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य कार्यक्रम यंदा २०व्या वर्षात पदार्पण करत असून, मंत्रमुग्ध करणारे दिवे आणि भक्तिसंगीत यांचा सुंदर मिलाफ या उत्सवात अनुभवता येणार आहे.

गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री १२:०० या वेळेत लक्ष्मीपूजन, भव्य भक्तिसंगीत, दिवे आणि लाडू अपर्णाचा विशेष सोहळा होणार आहे. त्यानंतर, शुक्रवार, १ नोव्हेंबर २०२४ रोजी ही सायंकाळी ७.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत भक्तिसंगीत आणि रोषणाईने उजळून निघेल.

पुणे व परिसरातील सर्व भाविकांना आपल्या परिवारासह या भक्तिपूर्ण वातावरणाचा लाभ घेण्याचे सादर आमंत्रण करण्यात आले आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाचे लाभार्थी कुटुंब कै. मोहनलालजी गुलाबचंदजी बाठिया परिवार (राजेंद्रकुमार मोहनलाल अँड कंपनी), मार्केटयार्ड, पुणे हे आहेत.

उत्कृष्ट बासरी, शहनाई, सितार, तबला अशा वाद्यांसह वाद्यवृंद सादर होणार आहे, तरी सर्वांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन राजेंद्र बाठिया यांनी केले आहे.