महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पर्वती मतदार संघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी (दि.०७ नोव्हेंबर २०२४) मार्केट यार्डात प्रचार फेरी काढली. उद्योगपती अभय संचेती यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी मार्केट यार्डातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार फेरीला व्यापारी, नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.















