महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला, मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
राज्यात निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी शेअर बाजारही बंद राहणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.