आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्रद्धास्थळाच्या विध्वंसाविरोधात जैन समाजाचा एल्गार

Spread the love

पुणे : मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बीएमसीकडून पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन समाजाकडून तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जैन बांधवांनी सहभागी होत शांततापूर्ण भूमिका मांडली.

जैन समाजातील चारही प्रमुख संप्रदाय – दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी – यांनी एकत्र येत या आंदोलनात सहभाग घेतला, हे या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. विद्यार्थी, युवक, महिला यांचा मोठा सहभाग होता.

सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनात प्रशासन परिसर व बीएमसीविरोधी घोषणांनी दणाणून गेला होता. धार्मिक स्थळांवर घाव घालणे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही. जैन समाजाने या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – धार्मिक स्थळांचा अवमान सहन केला जाणार नाही.”

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे सादर केली. मंदिर पाडणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी होती.

या आंदोलनात अचल जैन, मिलिंद फडे, विजयकांत कोठारी, अॅड अभय छाजेड, इंद्रकुमार छाजेड, बाळासाहेब ओसवाल, प्रविण चोरबेले, युवराज शहा, अक्षय जैन, देवीचंद जैन, राजेश शहा, अजित पाटील, भरत सुराणा, नितीन जैन, बाळासाहेब धोका, अशोक पगारिया, महावीर कटारिया, अभिजीत डुंगरवाल, सुजाता शहा, योगेश पांडे, सुरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, खुशाली चोरडिया, जिनेन्द्र कावेडीया, संजय नाईक, सुदीन खोत, संदीप भंडारी, शीतल लोहाड, उत्कर्ष गांधी, नीलेश शाह, पुष्पा कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकीय क्षेत्रातूनही समर्थन लाभले असून अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, अविनाश बागवे, संगीता तिवारी, सौरभ आमराळे, सौरभ शिंदे, नवाझ सय्यद यांचाही सहभाग होता.