प. पू. लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामींच्या सानिध्यात भाविकांसाठी अध्यात्मिक पर्व
महाराष्ट्र जैन वार्ता
भूम : श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे आषाढ अष्टान्हिक पर्वानिमित्त बृहत सिद्धचक्र आराधना विधान महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भूम येथील शितलकुमार शहा यांच्या वतीने दिनांक ३ जुलै ते ११ जुलै २०२५ दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, व्रतबंधन, सिद्धचक्र विधान अशा पवित्र धार्मिक विधींचा समावेश असून, भाविक भक्तांसाठी अध्यात्मिक उन्नतीचे हे पर्व ठरणार आहे. कार्यक्रमाचे सान्निध्य प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे लाभले असून, धार्मिक विधी पं. श्री वृषभसेनजी जिनदत्त उपाध्ये यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत.
या दिव्य आणि पुण्यप्रद पर्वाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन शितल शहा, सुरज शहा, धीरज शहा व परिवार यांच्यावतीने तसेच श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
