आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’

Spread the love

पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते ठाकूर अनुप सिंह आणि रोहित रॉय, परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, संतोष नारायणकर, सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, अमोल कुंभार, विजया गायकवाड यांसह अनेक मान्यवर,तसेच सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्यकारी अधिकारी अक्षित कुशाल, विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. चोरडिया यांच्या दीर्घकाळ चाललेल्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक योगदानाची दखल घेत त्यांना या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. “सूर्यदत्त संस्थेत आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची, पराक्रमाची आणि नेतृत्वाची शिकवण देतो.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तृत्वाचा आदर्श ठेवावा तसेच समाजात सन्मान, निष्ठा आणि जबाबदारीची उदाहरणे घडवावी, अशी आमची नेहमीच अपेक्षा असते. धाडस हे फक्त शब्दात नसून सत्कर्मातून दिसले पाहिजे आणि त्याच वेळी आपली जबाबदारी व संयम यांचेही भान ठेवले पाहिजे.

हीच खरी शिकवण आहे, जी महाराजांच्या आयुष्यातून मिळते आणि जी प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात प्रेरणादायी ठरू शकते.”