ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेकडून शिवसृष्टी येथे पाणपोई सुरू
वाढत्या उष्णतेत नागरिकांना दिलासा : १५ जूनपर्यंत सेवा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा परिसरात पाणपोईचे उद्घाटन उत्साहात पार पडले. बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि जय शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा राऊत यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम विजय राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच या पाणपोईचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या पाणपोईचा लाभ बार्शी शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही घेता येणार असून ही पाणपोई १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. पु
ढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी) पासून १५ जूनपर्यंत पाणपोई सुरू ठेवण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी दिली.
या उपक्रमासाठी गव्हाणे एक्वा चे मालक बंडू गव्हाणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पी.आय. बालाजी कुकडे, विजय राऊत, संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी, अजय तिवारी, संतोष शेळगावकर, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, अमोल वाणी, प्रा. सचिन मस्के, सुरेंद्र जंगम, राहुल वडेकर, रतिकांत झळके, सचिन पाटील, रज्जाक तांबोळी, अतुल वाणी, सुनील नवले, सूरज हाजगुडे, सायरा मुल्ला, अलका हाडगे यांसह पत्रकार बांधव व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मानले.
