आवृत्ती , पुणे

सहा ड्रग्ज तस्करांकडून ४२ लाखांची एमडी पावडर जप्त

लोणीकंद पोलिसांची कारवाई : विशेष मोहिमेत १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन पावडर जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘पुणे फ्री ड्रग्ज’ या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांच्याकडून ४१ लाख ९६ हजार रुपयांची १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केली आहे. पुंजाजी जयचंद्र … Read more

तरुणीच्या गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न

चंदननगरमधील जखमी तरुणीची प्रकृती गंभीर : प्रियकर झाला फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने घरात शिरून ब्लेडने तरुणीचा गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. दिनकर पठारे वस्ती, चंदननगर, मूळ रा. उत्तर … Read more

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेकडून शिवसृष्टी येथे पाणपोई सुरू

वाढत्या उष्णतेत नागरिकांना दिलासा : १५ जूनपर्यंत सेवा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा परिसरात पाणपोईचे उद्घाटन उत्साहात पार पडले. बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आणि जय शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दादा राऊत यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. … Read more

SIMMC ला IMC RBNQA गुणवत्ता पुरस्कार जाहीर

शिक्षण श्रेणीत ‘कमेंडेशन सर्टिफिकेट’ : गुणवत्तावृद्धीतील सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) यांना IMC रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवॉर्ड्स (IMC RBNQA) 2025 सायकलमध्ये प्रतिष्ठित ‘IMC RBNQA – एज्युकेशन कॅटेगरीतील कमेंडेशन सर्टिफिकेट’ मिळाल्याची अभिमानास्पद घोषणा करण्यात येत आहे. मागील 5 वर्षांत मिळालेला हा तिसरा IMC RBNQA … Read more

गंगाधाम रोडवरील बंद कंपनीतून क्लोरीन वायूची गळती

कोंढवा परिसरातील ५० तर अंबामाता मंदिर परिसरातील २४ नागरिकांवर उपचार सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका बंद रासायनिक कंपनीच्या गोदामात ठेवलेल्या क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर श्वसनाचा त्रास झाला. खालचा कोंढवा परिसरातील सुमारे ५० नागरिकांना त्रास झाला, तर अंबामाता मंदिर परिसरातील २४ नागरिकांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात … Read more

सराईत गुंडाचा खून करणाऱ्या ५ जणांना अटक

जुन्या भांडणाच्या कारणावरून मित्रांनीच त्याच्याच शस्त्राने काढला काटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारंवार त्रास देणाऱ्या सराईत गुंडाचा त्याच्याच मित्रांनी, त्यानेच दिलेल्या शस्त्राने वार करून खून केला. फुरसुंगी पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आकाश ऊर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे … Read more

अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : अल्पवयीन सराईत गुन्हेगार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी परिसरात कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराकडून खंडणी विरोधी पथकाने एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. हा सराईत बालगुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी विरोधी पथक २२ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस … Read more

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पतीचे आईवडील, मुलगी यांच्या मरणाची केली कामना : खराडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तिचे त्याच्याबरोबरचे तिसरे लग्न, तर त्याचे दुसरे लग्न. दोघांचे एक मुलगा व मुलगी त्यांच्याबरोबर राहत होते. ड्रग्ज प्रकरणात महिलेचा मुलगा तुरुंगात गेल्याने ती माहेरी निघून गेली. तेव्हा आपल्याला आई-वडील आणि पहिल्या पत्नीच्या मुलीपासून तोडण्यासाठी पत्नी वशीकरण करत … Read more