२२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे : पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचा समावेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या सेवाकालातील प्रशंसनीय कार्यासाठी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे आणि पुण्यातील पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचा त्यामध्ये समावेश आहे.
पोलीस अधिकारी (पद) – नेमणुकीचे ठिकाण
वाहिद अकबर पठाण (पोलीस निरीक्षक) – गुन्हे शाखा
विजया शिवाजी खुटवड (सहायक पोलीस उपनिरीक्षक) – नांदेड सिटी पोलीस ठाणे
रुस्मत इसाक मुजावर (सहायक पोलीस उपनिरीक्षक) – बाणेर पोलीस ठाणे
प्रवीण ज्ञानदेव शिंदे (सहायक पोलीस उपनिरीक्षक) – हडपसर पोलीस ठाणे
आश्रुबा चांगदेव मोराळे (पोलीस हवालदार) – स्वारगेट पोलीस ठाणे
सलीन इन्नुस तांबोळी (पोलीस हवालदार) – काळेपडळ पोलीस ठाणे
रामदास निवृत्ती गोणते (पोलीस हवालदार) – वारजे पोलीस ठाणे
निलेश सोपान पर्वते (पोलीस हवालदार) – वाहतूक शाखा
दयाराम दादाराव शेगर (पोलीस हवालदार) – वानवडी पोलीस ठाणे
शंकर बाबुराव कुंभार (पोलीस हवालदार) – गुन्हे शाखा
सुजित महादेव पवार (पोलीस हवालदार चालक) – मोटार परिवहन विभाग
अमोल परशुराम पिलाणे (पोलीस हवालदार) – वानवडी पोलीस ठाणे
सौदुबा आप्पाराव भोजराव (पोलीस हवालदार) – गुन्हे शाखा
प्रगती रामहरी ठोंबरे (पोलीस अंमलदार) – वानवडी पोलीस ठाणे
पिंपरीतील ८ पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कोणकेरी, दीपक महाजन, पोलीस हवालदार आशिष बोटके, संतोष शिंदे आणि पोलीस शिपाई यामिनी ठाकरे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
