आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 6, 2026
Spread the love

पुणे : फुरसुंगी येथील गंगानगर भागात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

साहिल शाम नरळकर (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमूर्ती हौसिंग सोसायटी, भोसरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. साहिल नरळकर याच्यावर यापूर्वी आर्म अॅक्ट तसेच वाहन तोडफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक ५ मे रोजी पूर्व भागात समांतर रात्रगस्त पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शेखर काटे व तानाजी देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साहिल नरळकर हा फुरसुंगीतील गंगानगर भागात फिरत असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे.

या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी शोध घेऊन साहिल नरळकर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. फुरसुंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेप्रमाणे, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, गणेश माने, शेखर काटे व उमेश शेलार यांनी केली आहे.