आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाणेर येथे ‘आपुलकी’ कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 18, 2026
Spread the love

पुणे : पुणे महानगरपालिका आणि ‘आपुलकी’ हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘आपुलकी’ कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन शनिवार, दि. १७ मे २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्करोगग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर सुरू करण्यात आलेले हे केंद्र पुणे शहरासह राज्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

उद्घाटन समारंभात रुग्णालयाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ‘आपुलकी’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रितेश मुनोत, उद्योगपती सुनील नहार, सचिन नहार, राजेंद्र मुथा, पल्लवी भटेवरा आणि रवी जैन यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘आपुलकी’ रुग्णालयामुळे भविष्यात कर्करोग उपचार अधिक सुलभ आणि कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

कर्करोगाविरोधातील लढ्यासाठी शासन विविध पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न करत आहे. पुणे महानगरपालिका आणि ‘आपुलकी’ मेडिकल सेंटरच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.

या मॉडेलच्या आधारावर भविष्यात राज्यात अशा स्वरूपाची अनेक रुग्णालये उभारता येतील. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.