आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिद्धार्थ चौकात एमडीसह दोघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 13, 2026
Spread the love

सोलापूर : सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १४.५१० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, दोन मोबाईल व रोख रक्कम असा ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) डॉ. प्रीतम यावलकर आणि सहायक पोलीस आयुक्त (विभाग-२) विजयालक्ष्मी कुऱ्हे यांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवींद्रनाथ भंडारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक ११ जुलै रोजी हद्दीत गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान सिद्धार्थ चौकातील पाण्याच्या टाकीजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १४.५१० ग्रॅम एमडी अमली पदार्थ, दोन मोबाईल आणि १ हजार रुपये रोख असा ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुजम्मील हबीब काझीबीर (वय २९, रा. साखर पेठ, सोलापूर) व निलेश बसवराज बिदूर (वय २७, रा. काडादी चाळ, रेल्वे स्टेशन परिसर, सोलापूर) यांचा समावेश आहे.

या दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राहुल सावंत, पोलीस हवालदार संतोष पापडे, मुलाणी, राजेश चव्हाण, बागलकोटे, प्रमोद पकाले, पोलीस अंमलदार क्र. १२०६ गायकवाड, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, परशुराम म्हेत्रे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, पोलीस अंमलदार क्र. १५९४ काशिनाथ वाडेकर आणि आनंद निंबाळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.