गुरुवारी लष्कर जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद
कॅम्प, वानवडी, रामटेकडी, मगरपट्टा, हडपसर, खराडी परिसरातील पाणी बंद राहणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथील विद्युत व यांत्रिकी विषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे ३० जुलै २०२६ रोजी अत्यावश्यक देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी या पंपिंग केंद्राच्या अखत्यारीतील परिसरात दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
रामटेकडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण (अंशतः), महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी, एसआयपीएफ, वैदुवाडी, भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर ते १४ गल्ली, हडपसर गावठाण (अंशतः), माळवाडी, मुंढवा, १५ नंबर, मगरपट्टा सिटी, काळेपडळ (रेल्वेच्या उजव्या बाजूस), केशवनगर, साडेसतरा नळी, म्हसोबा नगर, काळेबोराटेनगर, हांडेवाडी रोड, भुजबळ वस्ती.
वानवडी २८५ टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : वानवडी गावठाण, चौगुले मळा, शितळादेवी मंदिर व परिसर, बकरी हिल टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझाद नगर, शांतीनगर, केदारी नगर, काकडे मैदान परिसर, मानेवस्ती, जांभूळकर वस्ती, जगताप चौक व इतर परिसर, विकासनगर, शिंदे छत्री परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी, आझादनगर, मानेवस्ती, संविधान चौक ते गंगा सॅटेलाईट चौक, सिद्धार्थ नगर, उंड्री रस्ता, ब्रम्हा काउंटीज, कोणार्क इंद्रायू.
हाय सर्व्हिस टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : बी.टी. कवडे रोड (दोन्ही बाजू), भीमनगर, घोरपडी (अंशतः), भारत फोर्ज कंपनीलगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, एस. व्ही. नगर, लक्ष्मीनगर, घोरपडी उर्वरित भाग, तारादत्त कॉलनी, डांबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, कमांड हॉस्पिटल, भीमपुरा गल्ली क्र. १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, एम. जी. रोड, ईस्ट स्ट्रीट, जी.ई. साऊथ, सेंट्रल.
कॅम्प टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत.
रेसकोर्स टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : घोरपडी (अंशतः), श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, पासपोर्ट ऑफिस परिसर, कोरेगाव पार्क ब्रिज.
ठाकरसी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा भाग : येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता, मदर तेरेसा, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नुरानी मस्जिद, नेताजी नगर, गांधीनगर, कश्मीर कॉलनी, भीमाशंकर वसाहत, यशवंत नगर, खड्डा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, डॉ. आंबेडकर वसतिगृह, सुभाषनगर, नवी खडकी, तालिमी पर्वत, बाराते वस्ती, भोसले वस्ती, कुमार आंगण, संगमवाडी, जयजवान नगर, रामनगर, यू.पी. हॉटेल परिसर, अशोकनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, बंड नं. ५, नगर रोड, डंकर लाईन, कल्याणीनगर, अधीक्षक बंगला परिसर इ.
लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद होणारा परिसर : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.
