परिमंडळ २ मधून आठ सराईत गुन्हेगार तडीपार
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई : स्वारगेट, पर्वती, भारती विद्यापीठ परिसरातील गुंड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आठ जणांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तसेच पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये निखील लगाडे टोळीतील चार गुंडांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हेगारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, गंभीर मारहाण, विनयभंग, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अमली पदार्थांची विक्री, धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध स्वरूपांच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे – संकेत गोरख चोरगे (वय २४, रा. साई सिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार), आकाश ऊर्फ बंटी विलास पवार (वय २६, सध्या रा. शनिनगर, हनुमाननगर, आंबेगाव खुर्द, पुणे. मूळ रा. जनता वसाहत, पर्वती).
पर्वती पोलीस ठाणे – वैभव युवराज डोळसे (वय २३, रा. जनता वसाहत, पर्वती), सौरभ राजेश साठे (वय २०, रा. अनंतकृपा सोसायटी, दत्तवाडी).
स्वारगेट पोलीस ठाणे – निखील ज्ञानोबा लगाडे (वय २२, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) (टोळीप्रमुख), विष्णू लक्ष्मण होसमनी (वय २१, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), अमान शाकीर शेख (वय २०, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) आणि सचिन ऊर्फ आश्रय सौदागर खुडे (वय २४, रा. इंदिरानगर खड्डा). हे सर्व टोळीचे सदस्य आहेत.
१ जानेवारीपासून आतापर्यंत ५३ गुन्हेगार तडीपार –
आंबेगाव पोलीस ठाणे – ११
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे – १३
पर्वती पोलीस ठाणे – ९
बिबवेवाडी पोलीस ठाणे – ९
स्वारगेट पोलीस ठाणे – ५
मार्केटयार्ड पोलीस ठाणे – ४
सहकारनगर पोलीस ठाणे – २
