सूर्यदत्त नॅशनल स्कूलला ‘India’s Best Schools 2026’ मध्ये मानाचे AAA+ मानांकन
Careers360 च्या राष्ट्रीय क्रमवारीत ‘डे स्कूल’ श्रेणीत उल्लेखनीय यश : एआय, हरित कौशल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मिळाली दाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कूलने शैक्षणिक गुणवत्तेचा आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. Careers360 च्या ‘India’s Best Schools 2026’ क्रमवारीत शाळेला ‘डे स्कूल’ श्रेणीत प्रतिष्ठेचे AAA+ मानांकन मिळाले असून, तंत्रज्ञानाधारित शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल मानली जात आहे.
विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसाठी माहिती, मार्गदर्शन व शैक्षणिक पर्याय उपलब्ध करून देणारे Careers360 हे डेटा व तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक व्यासपीठ विविध निकषांवर शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करते.
यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांची क्षमता, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांचा सखोल विचार केला जातो.
याच निकषांच्या आधारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रसिद्ध झालेल्या ‘India’s Best Schools 2026’ क्रमवारीत पुण्यातील बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कूलला ‘डे स्कूल’ श्रेणीत AAA+ मानांकन प्राप्त झाले आहे.
शाळेत बदलत्या डिजिटल युगाच्या गरजा लक्षात घेऊन रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि STEM आधारित शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचा सर्जनशील व जबाबदार वापर करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.
याशिवाय अनुभवाधारित, प्रकल्पाधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावरही शाळेचा विशेष भर आहे.
पर्यावरण संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी हरित कौशल्यांवर आधारित विविध उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य शाळेकडून केले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सौ. सुषमा चोरडिया यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि सर्व हितचिंतकांचे आभार मानत भविष्यातही शैक्षणिक क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
Careers360 कडून मिळालेले AAA+ मानांकन हे आमच्या शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाधारित शिक्षण, नवकल्पना, कौशल्यविकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर सातत्याने भर देत आहोत. हे मानांकन आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी ठरेल. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
