सोलापुरात २ ऑगस्टला लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D1 चा भव्य कॅबिनेट पदग्रहण सोहळा
३१२ कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधी : लायन सुरज बागला यांच्या हस्ते पदग्रहण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 (लायन वर्ष 2026-27) यांच्या वतीने ‘नेतृत्व रंजन’ डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन या भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा रेजेंटा सेंट्रल शिवानी, चिंचोली एमआयडीसी, पुणे-सोलापूर रोड, सोलापूर येथे उत्साहात पार पडणार असून, संपूर्ण डिस्ट्रिक्टमधील लायन्स व लिओ सदस्यांसाठी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय सोहळा ठरणार आहे.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शाह-कासवा (PMJF) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास फर्स्ट लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट लायन रंजना राजेंद्र शहा – कांसवा (MJF) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमासाठी देशातील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून, लायन्स आंतरराष्ट्रीय संचालक सुरज बागला (PMJF) हे इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून नवनियुक्त डिस्ट्रिक्ट कॅबिनेटला पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजक लायन अशोक मेहता (PMJF) असून, 3234 मल्टिपल डिस्ट्रीकचे कौन्सिल सचिव/कोषाध्यक्ष लायन डॉ. विरेंद्र चिखले (PMJF) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय प्रथम उपप्रांतपाल लायन डॉ. किरण खोराटे (MJF), द्वितीय उपप्रांतपाल लायन मंगेश दोशी (PMJF), डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सचिव ला.रमेश जैन, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट कोषाध्यक्ष ला. सुरेश जाजू (MJF), डिस्ट्रिक्ट मुख्यालय प्रभारी ला. दिनेश बिराजदार तसेच लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ सौरभ मालू यांच्यासह डिस्ट्रिक्ट कॅबिनेटमधील सर्व पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
डिस्ट्रिक्ट 3234 D1 अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बारामती या विभागातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या ७७ लायन्स क्लब, १ लिओ-लायन्स क्लब आणि १० लिओ क्लब, अशा एकूण ८८ क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकारी या ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण डिस्ट्रिक्टचे नेतृत्व एका व्यासपीठावर एकत्र येणार आहे. यावर्षी डिस्ट्रिक्टच्या इतिहासात प्रथमच डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर्सची संख्या तब्बल ३१२ पर्यंत पोहोचली असून, या सर्व कॅबिनेट अधिकाऱ्यांचा शपथविधीही याच कार्यक्रमात पार पडणार आहे.
त्यामुळे हा सोहळा डिस्ट्रिक्ट 3234 D1 च्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि विक्रमी कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळ्यांपैकी एक ठरणार आहे.
सकाळी नोंदणी व स्वागतानंतर पदग्रहण समारंभास प्रारंभ होईल. नव्या कार्यकारिणीचा अधिकृत शपथविधी, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, आगामी सेवा प्रकल्पांचे सादरीकरण तसेच प्रांताच्या भावी वाटचालीचा संकल्प यामुळे हा सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
“सॅटिस्फिक्शन बाय सर्विस ” डिस्ट्रिक्टचे सेवाभावी ब्रीद वाक्य आणि “रुटेड इन सर्विस” या लायन्स इंटरनॅशनलच्या सेवाभावी ब्रीदवाक्याला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात येणार आहे.
समाजसेवा, नेतृत्व विकास आणि संघटनात्मक बळकटी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट 3234 D1 नवीन पर्वाची सुरुवात करणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या भव्य पदग्रहण सोहळ्यास डिस्ट्रिक्टमधील सर्व लायन्स, लिओ-लायन्स व लिओ सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
